मराठी राज्य गौरवभाषा

दिनांक – २७/०२/२०२४

स्थळ – भागुबाई चांगू ठाकूर विधि महाविद्यालय, न्यू पनवेल

महाराष्ट्रभर मराठी राज्य गौरवभाषा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोहा दिवस प्रसिद्ध लेखक कै. वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.

भागुबाई चांगू ठाकूर विधि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाद्वारेही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्राचार्या सौ. सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली प्राध्यापक राघव शर्मा यांनी आयोजित केला.या कार्यक्रमात ज्येष्ठ मराठी अभिनेते सुनील गोडबोले आणि तरुण कलाकार साईदत्त बळी यांनी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरू झाला आणि त्याचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाच्या एल.एल.बी.ची विद्यार्थिनी गायत्री गोखले आणि तृतीय वर्षाच्या बी.एल.एस. एल.एल.बी. ची विद्यार्थिनी श्रावणी माने यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अतिथिंच्या स्वागताने झाले.त्याच्या नंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. समृद्धी टीवाटने आणि साहिल म्हात्रे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.
यानंतर अनेक कार्यक्रम झाले ज्यामध्ये श्रावणीने प्रभो शिवाजीराजा हे गाणं सादर केले त्यानंतर राजदीपा मढवी हिने महाभारतातील भानुमतीच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक सादर केले नंतर निखिल गोरे यांनी मराठी नाटक “मी नाथूराम गोडसे” मधला एक छोटा अभिनय सादर केला. अनुष्का पाटील आणि वेदिका म्हात्रे यांनी एक सुंदर लावणी सादर केली. नंतर हिमांशू मेश्राम यांनी ” वऱ्हाड निघाले लंडनला” या प्रसिद्ध नाटकातली एक छोटी प्रस्तुती सादर केली. त्यानंतर कामिनी पाटील यांनी पोवाडा सादर केला आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रणिता वाघमारे, रचिता जाधव आणि सिद्धी भिंगारकर यांनी एक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचा विषय मराठी सीने सृष्टीची १११ वर्ष असून प्रत्येक दशकात सीने सृष्टीने दर्शविलेली यशोगाथा सूत्रसंचालकानी मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी साहिल म्हात्रे आणि समृद्धि टीवाटने यांनी दर्शकांना आपल्या मनोरंजक गप्पा बाज़ीने मोहूंन घेतले. आभार प्रदर्शन साहिल म्हात्रे यांनी व्यक्त केले आणि पसायदानाने कार्यक्रमाची समाप्ती झाली

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजना गावंड नेहा भगत साक्षी कांबळे रोहित प्रतीक आणि रिद्धी म्हस्के या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

Leave a comment