मराठी भाषा गौरव दिन – २०२२

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात  दिनांक २७/०२/२०२२ रोजी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळातर्फे “मराठी भाषा गौरव दिन” हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या झुम मिटींग या अकाऊंटवरुन संध्याकाळी ५:०० वाजता आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड श्री. वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या कार्यक्रमास मा. डॉ. सौ. अस्मिता वैद्य, प्राचार्या, शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड  यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक सादर केले.

प्रमुख अतिथी डॉ. सौ. अस्मिता वैद्य यांनी या कार्यक्रमात “मराठी भाषा – न्यायव्यवस्थेतील उपयोगिता आणि आव्हाने” ह्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी असे प्रतिपादन केले की जो पर्यंत मराठी न्यायशब्दकोश समृध्द होत नाही तो पर्यंत अभ्यासक्रमात  आणि न्यायालयात इंग्रजी शब्दांचा वापर होतच राहणार. त्यांनी असेही नमूद केले की चांगली वकीली करण्याकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायानिर्णय नियमितपणे वाचणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते निर्णय इंग्रजी भाषेतच असल्यामुळे विद्यार्थ्यांनी  इंग्रजी भाषेचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात डॉ. सौ. अस्मिता वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. संघप्रिया शेरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सहा. प्रा.  भाग्यश्री पाटील यांनी केले तर या कार्यक्रमात कु. समृद्धी तिवाटणे आणि फैझान शेख  या विद्यार्थ्यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या. या कार्यक्रमाची सुरवात ‘लाभले आम्हास भाग्य’ या मराठी अभिमान गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment