Republic Day – 2022

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  

दि. २६ जानेवारी २०२२ रोजी भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात बहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करोना साथीच्या रोगामुळे शासनाच्या निर्देशानुसार, जास्त गर्दी होवू न देण्यासाठी या वेळी केवळ महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड, सहा. प्राध्यापिका रॅव्हनीश बेक्टर, सौ. धनश्री चौगुले, कृपा नाईक प्रियांका उंडे भाग्यश्री पाटील, ग्रंथपाल हितेश छतानी, अकाऊंटंट सौ. पल्लवी खोत शिक्षकेतर कर्मचारी हृषीकेह हुद्दार, उज्वल पाटील, संजय दरवडा, प्रमोद कोळी, सचिन पवार, नितीन कोळी, महेश घरत, महेश पाटील तसेच सीकेटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. श्री. अनिल नकटी आणि प्रा. रुपेश पावशे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. या वेळी सर्व उपस्थीतांना अल्पोपहार देण्यात आला.

Leave a comment