Law at Your Doorstep -5-Webinars by Mum. Uni., Law Dpt. & B.C.T.College of Law

मुंबई विद्यापीठ, विधी शाखा आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे पाच दिवसांचा वेबीनार

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम २०२० – २१ अंतर्गत; ‘लॉं अ‍ॅट युवर डोअर स्टेप’ या २८/७/२०२० ते १/७/२०२० अशा सलग पाच दिवसांच्या वेबीनरचे आयोजन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते. या वेबीनारचे आयोजन भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या ‘झुम मिटींग’ या अकाऊंटवरुन करण्यात आले होते.

दिनांक २८/७/२०२० रोजी या वेबीनारचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी दुपारी २:३० वाजता केले. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी केले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या, विधी शाखेतील सहा. प्राध्यापक डॉ. श्री. संजय जाधव यांनी ‘आर्बिट्रेशन आणि मेडीएशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     दिनांक २९/७/२०२० रोजी जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला घुगे यांचे ‘आर्टीकल – २१ कॉन्स्टीट्यूशन ऑफ इंडीया – ग्लिम्प्स अॅट लँडमार्क जजमेंट्स’ या विषयावर, दिनांक ३०/७/२०२० रोजी अॅड. श्रीकांत गावंड, अति. सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांचे ‘कन्फेशन ऑफ अॅक्युज्ड इन क्रिमिनल लॉ’ या विषयावर, दिनांक ३१/७/२०२० रोजी अॅड. सौ. विरा गायकवाड, अति. सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांचे ‘ड्राफ्टींग ऑफ प्लिडींग अँड कॉन्व्हेयन्स’ या विषयावर तर शेवटी दिनांक १/८/२०२० रोजी अॅड. निरंजन मुंदरगी, वकील, मुंबई उच्च न्यायालय यांनी ‘रिलेव्हन्सी ऑफ फॅक्टस’ या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. या प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी प्रत्येक व्यक्त्याने प्रश्न-उत्तरे सदरात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.       

‘लॉं अ‍ॅट युवर डोअर स्टेप’ या मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने सुरू केलेल्या उपक्रमासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची सर्वात प्रथम निवड केल्याबद्दल प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांचे तसेच वेबीनार मध्ये मार्गदर्शन करणारे सर्व व्याख्याते आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब आणि व्हाईस चेअरमन श्री. वाय. टी. देशमुख साहेब आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांचे विशेष आभार मानले.  

त्यानंतर मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी या पाच दिवसांच्या वेबीनारच्या समारोपाचे भाषण देताना भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचे वेबीनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी होणार्‍या विविध कार्यक्रमांत भाग घेण्याचा सल्ला दिला.

     पाच दिवस चाललेल्या या वेबीनार मध्ये भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहा. प्रा. कु. श्रुती पोटे, प्रा. आष्का शुक्ला तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुयश बारटक्के कु. अक्षता ठाकूर, कु. संचिता करडक, कु. संचिता चिमणे आणि  फैजान शेख यांनी संयोजनाची जवाबदारी पार पाडली.

 

या वेबीनार मालिकेतील प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. या वेबीनार मध्ये सहभागी होणाऱ्यास, प्रत्येक दिवशीच्या उपस्थितीबाबत सहभागाचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले.

Leave a comment