Republic Day – 2020

दि. २६ जानेवारी २०२० रोजी भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात एक्काहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार राज्य घटनेतील मूल तत्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मूलतत्वे समाज मनावर कोरली जावीत या करीता आपल्या संविधानाची उद्देशिका (preamble) याचे सर्व उपस्थित विद्यार्थ्यानी आणि कर्मचारी यांचे समोर वाचन करण्यात आले.

उपस्थितांना संबोधीत करताना प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी असे प्रतिपादन केले की देशाची प्रगती होण्यासाठी आधी प्रत्येकाने आधी स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले पाहीजे आणि सुजाण नागरिकांमुळेच देशाचा योग्य विकास होवू शकतो.  त्यांनी प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर, यांचे तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब तसेच कार्यकारणी सदस्य यांचे, सीकेटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे श्री. भंडारी सर, यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

     प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर यांनी सर्वांना एक्काहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुढे नमूद केले की राज्य घटनेमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्य नमूद केली आहेत. जरी आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशासाठी खर्‍या अर्थाने योगदान द्यायचे असल्यास सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सध्या कोणत्याही कारणावरून मोर्चे काढले जातात. एखादया मुद्याच्या विरोधात एका गटाचा मोर्चा निघाला की लगेच त्या मुद्याच्या विरोधात दुसर्‍या गटाचा मोर्चा निघतो. त्यामुळे जो काही वेळ वाया जातो त्यामुळे शेवटी नुकसान देशाचे होते. त्यामुळे परस्थितीत आपल्यातील एकात्मता टिकवून ठेवणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान आहे.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते आणि सदर कार्यक्रमाचे संचनल आणि आभार प्रदर्शन कु. सिंड्रेला जयसन (चौथे वर्ष) या विद्यार्थीनीने केले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. या वेळी सर्व उपस्थीतांना अल्पोपहार देण्यात आला.

Leave a comment