वाचन प्रेरणा दिवस – आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – १५/१०/२०१८

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे दि. १५/१०/२०१८ रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयांकरीता आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा मराठी भाषेत होती. या वर्षी जनार्दन भगत शिक्षण प्रसाराक संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर स्पर्धेसाठी श्री. दामोदर म्हात्रे, जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश (निवृत्त) हे प्रमुख अतिथी म्हणून तर सौ. वर्षाताई प्रशांत ठाकूर, सदस्या, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थीत होत्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, विधी महाविद्यालयाचे स्फुर्तीस्थान स्वर्गीय भागुबाई चांगु ठाकूर, स्वर्गीय श्री जनार्दन भगत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सौ. शितला गावंड, प्राचार्या यांनी मान्यवरांचे स्वागत करून, त्यांची ओळख करून दिली. त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सदर स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश नमूद करून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची माहीती थोडक्यात नमूद केली. श्री. दामोदर म्हात्रे, जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश (निवृत्त) हे प्रमुख अतिथी यांनी अशा स्पर्धांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी असलेले महत्व अधोरेखीत करून, वाचनाचे महत्व विषद केले. सौ. वर्षाताई प्रशांत ठाकूर, सदस्या, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, विशेष अतिथी यांनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजीत केल्याबदल गौरोवोद्गार काढून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

सदर वक्तृत्व स्पर्धेसाठी १) आधुनिकीकरण आणि वाचन संस्कृती, २) एकत्र कुटुंब – काळाची गरज? ३) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – एक अफलातून व्यक्तीमत्व ४) यत्र नार्यस्तु पूज्यन्ते? आणि ५) समाजमाध्यम वि. वृत्तपत्रे, असे विषय होते. प्रत्येक स्पर्धकास बोलण्यासाठी जास्तीत जास्त सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.

  श्री. दामोदर म्हात्रे, जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश (निवृत्त) यांनी सदर स्पर्धेचे मूल्यांकन केले आणि स्पर्धकांस देण्यात आलेल्या गुणांनुसार अंतिम निकाल जाहीर करून प्रथम तीन विजेत्यांची नावे जाहीर केली आणि त्यांस प्रशस्तीपत्रके आणि बक्षीसे देण्यात आली. इतर स्पर्धकांना सहभागाची प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

सदर स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे

१) प्रथम क्रमांक : मंगला महाडीक, सी. के. टी. महाविद्यालय

२) द्वीतीय क्रमांक : आरती केदार – रामशेठ ठाकूर महाविद्यालय

३) तृतीय क्रमांक : सागर धोत्रे – बी. सी. टी. विधी महाविद्यालय

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरदा जाधव हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. कृतांजली म्हात्रे,  सचीव, मराठी वाङ्मय मंडळ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment