Late Shri. Janardan Bhagat Memorial Lecture Series, Lecture-2 by Shri. Ram Apte, Senior Counsel, High Court, Bombay

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात स्व. श्री. जनार्दन भगत स्मरणीय व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ श्री राम आपटे यांचे “महसूली खटले” (Overview of Revenue Litigation) या विषयावर व्याख्यान

रायगड जिल्ह्यातील ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था’ या अग्रणी शिक्षण संस्थेस यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब आणि व्हाईस चेअरमन श्री. वाय. टी. देशमूख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्वर्गवासी श्री. जनार्दन भगत स्मरणीय व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे. दिनांक २७/१०/२०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश श्री. अभय ओक यांनी सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन केले आणि दि. २८/१०/२०१८ रोजी व्याख्यान मालेच्या दुसर्‍या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ श्री राम आपटे यांचे “महसूली खटले” या विषयावर व्याख्यान झाले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर श्री राम आपटे यांचे स्वागत प्राचार्या सौ. शितला गावंड पुष्पगुच्छ आणि प्रतिकचिन्ह देवून केले. श्री. राम आपटे यांनी “महसुली खटले” या विषयावर बोलताना मोगल काळापासून ते आजपर्यंत जमिनीची मालकीची संकल्पना कशी बदलत गेली याचे विवरण करून या विषयात अंतर्भूत होणारे अंतर्भूत होणारे मामलेदार कोर्ट कायदा, जमीन महसूल अधिनियम, कुळ वहीवाट व शेताजमीन अधिनियम, तुकडे जोड आणि तुकडेबंदी अधिनियम या कायद्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात नमूद केले. सर्वात महत्वाचे म्हणजे सात बाराचा उतारा आणि फेरफार यांचे वाचन कसे करावे आणि त्याचे कायदेशीर महत्व समजावून सांगितले. त्याचबरोबर दिवाणी न्यायालयातील खटले आणि महसुली न्यायालयातील खटले यातील फरक समजावून सांगतानाच, तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांचे न्यायालयातील कार्यप्रणाली थोडक्यात स्पष्ट केले.
त्यानंतर प्रश्न उत्तरे या सदरात मुख्य अतिथी श्री. राम आपटे यांनी विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली.
या कार्यक्रमाकरीता रविवार असूनही प्रचंड मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयातीत अतिरिक्त सरकारी वकील श्री. श्रीकांत गावंड, अ‍ॅड. विनायक कोळी सहा. प्राध्यापिका सौ. सरिता समेळ, सहा. प्राध्यापिका सौ. दिपाली बाबर हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षता ठाकूर या पाच वर्षीय अभ्यासक्रम, तृतीय वर्ष या विद्यार्थीनीने केले तर आभार प्रदर्शन अलिशा पवार, पाच वर्षीय अभ्यासक्रम, व्दितीय वर्ष यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment