वाचन प्रेरणा दिवस – आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – १५/१०/२०१८

दिनांक : ११/ १० / २०१८

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,

दि. १५/१०/२०१८ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचा आहे. त्या अनुषंगाने भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे दि. १५/१०/२०१८ रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर वक्तृत्व स्पर्धा फक्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयांकरीता खुली राहील. स्पर्धा मराठी भाषेत असेल. प्रत्येक स्पर्धकास बोलण्यासाठी जास्तीत जास्त सहा मिनिटांचा कालावधी उपलब्ध राहील. जातीवाचक, राजकीय, आक्षेपार्ह अथवा श्रोत्यांच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य करू नये. असे केल्यास स्पर्धकास तिथेच थांबवून स्पर्धेतून निष्कासीत करण्यात येईल. सदर स्पर्धेतील प्रथम तीन स्पर्धकांस प्रशस्तीपत्रक आणि बक्षीसे दिली जातील. इतर स्पर्धकांना सहभागाची प्रशस्तीपत्रके दिली जातील. स्पर्धेच्या न्यायाधीशांचा निर्णय अंतिम असेल.

: स्पर्धेचे विषय :

  • आधुनिकीकरण आणि वाचन संस्कृती
  • एकत्र कुटुंब – काळाची गरज?
  • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – एक अफलातून व्यक्तीमत्व
  • यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?
  • समाजमाध्यम वि. वृत्तपत्रे

तरी सदर स्पर्धेत भाग घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांची नावे दिनांक १३/१०/२०१८ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या संबधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत पाठवावीत.

अधिक माहितीसाठी संपर्क:

डॉ. सौ. शितला श्रीकांत गावंड, प्र प्राचार्या, – दूरध्वनी क्र. ८८५०३१०९४९

कु. कृतांजली म्हात्रे,  सचीव, मराठी वाङ्मय मंडळ, – दूरध्वनी क्र. ९५९४१३१७०२

कु. मृण्मयी खांबेटे, सदस्य, मराठी वाङ्मय मंडळ,  – दूरध्वनी क्र. ९८२१५८२६८६

तरी सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेकरीता उपस्थित रहावे.

डॉ. सौ. शितला श्रीकांत गावंड,

प्र प्राचार्या,

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालय,

नवीन पनवेल

Leave a comment

Contact Us

Enquiry For BCT College of Law